कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, अर्णब गोस्वामींच्या अटकेवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

Arnab Goswami & Anil Deshmukh

मुंबई :- अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी प्रतिक्रिया दिली. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल, असे देशमुख म्हणाले. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा विरोध केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावरील अटकेची कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलं आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन ते चार वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल. ही केस बंद झाली होती. अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली, असे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : अर्णव गोस्वामींच्या अटकेवर सोनिया गांधी आणि पवारांनी भूमिका स्पष्ट करावी :  आशिष शेलार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER