कुणालाही घाबरत नाही; गणेश नाईकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बजावले

Ganesh Naik

नवी मुंबई : मी कुणाला घाबरत नाही, असे भाजपाचे नेते गणेश नाईक यांनी विरोधकांना बजावले. आज वाशी येथे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात नेत्यांनी गणेश नाईक यांच्यावर भरपूर टीका केली. त्या संदर्भात नाईक पत्रकारांशी बोलत होते.

२५ वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केले आहे

मी कुणाला घाबरत नाही आणि कुणाचे नाव घेऊन टीका ही करत नाही. २५ वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केले आहे. मी आजवर कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. भ्रष्टाचार केला, असा आरोप ते करीत असतील तर आरोप सिद्ध करा, असे आव्हान नाईक यांनी विरोधकांना दिले.

महापौर भाजपचाच (BJP) असेल : गणेश नाईक (Ganesh Naik)

मी भाजपामध्ये आहे आणि राहीन. भाजपा सोडणार नाही. महापौर भाजपाचाच बसेल, असा विश्वासही गणेश नाईक यांनी व्यक्त केला. विरोधकांना टीका करायची ती करू द्या. मी जनसेवेचा वसा कायम ठेवेन, असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER