गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बचावासाठी आघाडीतील कुणीच येत नाहीये समोर ? देशमुख पडलेत का एकाकी ?

Maharashtra Today

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वझे (Sachin Vaze)प्रकणाचा तपास एन.आय. ए. या केंद्रीय तपास पथकाकडे गेला आणि महाविकास आघाडीच्या अडचणी वाढायला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ‘अर्थसंकल्पीय अधिवेशनात’ वाझे प्रकरण चांगलचं उचलून धरलं होतं. वाझे प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत आणि यामुळं गृहमंत्री देशमुखांच्या (Home Minister Anil Deshmukh)खुर्चीवर टांगटी तलवार असल्याचं चित्र उभ राहतंय.

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडली आणि याप्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाली. या प्रकरणामुळं राजकिय वातावरण चांगलच तापलंय. अनिल देशमुखांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उभारलं जातंय. अशातच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची काल दिल्लीत भेट घेतली. भेटीच कारण स्पष्ट नसलं तरी राजीनाम्याच्या मागणीसाठी पवारांनी देशमुखांना दिल्लीत बोलवलं अशा चर्चेला आता तोंड फुटलंय.

शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली.

दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली होती. “गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चांगलं काम करत आहेत. गृहमंत्री बदलाची गरज नाही.” असं विधान त्यांनी केलं. शरद पवारांची भेट अनिल देशमुखांनी घेतली आणि माध्यमांवर राजीनाम्यासाठी देशमुखांना पवारांनी बोलावून घेतल्याच्या बातम्या रंगल्या. राजीनाम्याच्या चर्चेला पुर्ण विराम लावण्यासाठी स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी झालेली भेट राजीनाम्यासंबंधी नसल्याचं स्प्ष्ट केलंय.

“आज मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पासंदर्भात मा.पवार साहेबांची भेट घेतली व मागील २ दिवसांत मनसुख हिरेन व सचिन वाझे प्रकरणाविषयीने केलेल्या तपासाची चर्चा झाली. इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्या,त्यात कोणतेही तथ्य नाही.” असा खुलासा देशमुखांनी झालेल्या भेटीवर केलाय.

गृहमंत्री एकटं पडलेत का?

मनसुख हिरने प्रकरणावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हाय होल्टेच ड्रामा पहायला मिळाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या सर्व आमदारांना एकत्र करत गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला चढवला. अनिल देशमुखांकडे पहिल्यांदा गृहखात्या सारख्या मोठ्या खात्याची जबाबदारी आलीये. विरोधी पक्षनेते त्यांच्यावर हल्ला करत असताना गृहमंत्र्यांच्या बचावात इतर कोणताच आमदार आल्याचं दिसलं नाही.

सभागृहाचे कामकाज मंत्री अनिल परब आणि शिवसेनेचे एकदोन आमदार वगळता अनिल देशमुखांचा बचाव करण्याची तसदी इतर आमदारांनी घेतली नसल्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये कुरबुर सुरु असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणनं आहे.

एन. आय. ए. च्या तपासावर गृहमंत्री म्हणाले

‘एनआयए आणि एटीएस या प्रकरणाचा सर्व तपास करत आहेत. त्यांना राज्य शासनाकडून सर्व मदत आम्ही करत आहोत. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. याचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, त्याची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई राज्य सरकार करेल,’ अशी ग्वाही देशमुखांनी दिली आहे.

दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सचिन वाझे प्रकरणात मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. “मनसुख हिरेन हत्ये प्रकरणात राज्याकडून तपास एन. आय. ए. कडे गेला आणि सत्य जनते समोर येतंय, या प्रकरणाव मुख्यमंत्र्यांनी सचिन वझे काय लादेन आहे का? असं विधान केलं होतं, नकळत वझेला पाठिंबा दिल्याची भूमिका घेतली होती. प्रकरण राज्याच्या तपास यंत्रणेकडं होतं यामुळं जनतेच्या मनात अनेक प्रश्न होते. पण आता एन.आय.ए. सत्य बाहेर काढेल. असा मला विश्वास आहे.” अशी प्रतिक्रिया आज दरेकरांनी दिलीये.

“देशमुखांनी राजीनाम दिलाच पाहिजे”- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

सचिन वाझे प्रकरणात वाझेंची उचल बांगडी केली पण आता गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ही मागणी करतानाच ते पुढे म्हणालेत. गेल्या वर्षभरापासून राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलताना दररोज चार महिलांवर अत्याचार होतात, पोलिस अधिकारी स्फोटकं ठेवताना सापडतो, राज्यात गंभीर परिस्थीती आहे, गृहमंत्र्यांनी आता राजीनामा द्यावा, असंही ते म्हणालेत.

त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता गृहमंत्री अनिल देशमुख एकाकी पडल्याचं चित्र आता समोर येतंय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER