धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही, शिवसेना नेत्याचे मुंडेंना समर्थन

Gulabrao Patil

मुंबई :- ‘धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) जाहीरपणे आपल्या दुसऱ्या कुटुंबाची कबुली दिल्यनातंरही विरोधकांकडून या प्रकरणी राजकारण केले जात आहे. मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही’, अशा शब्दांत शिवसेना (Shivsena) नेते मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मुंडे यांचे समर्थन केले आहे.

गुलाबराव म्हणाले, ‘धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची स्वत: कबुली दिली आहे. त्यांची कायदेशीर लढाई सुरू आहे. परंतु विरोधकांकडून याप्रश्नी उगाच राजकारण केले जात आहे. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कोणालाही नाही. धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, असे मला वाटते. ते आपले निर्दोषत्व लवकरच सिद्ध करतील,’ असा विश्वास देखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

तसेच, ‘एखादा माणूस कबुली देत असेल तरीही तुम्ही त्याला चोर ठरवणार काय? त्यांना काही लपवायचे असते तर त्यांनी जाहीरपणे कबुली दिलीच नसती. अशा पद्धतीने राजकारण करून एखाद्याची ३० वर्षांची तपश्चर्या उद्ध्वस्त करू,’ असे जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड लसीकरणाला गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER