भाजपला खोटं बोलायची सवय; राष्ट्रवादीच्या नेत्याकडून राठोड यांचा बचाव

Nawab Malik -Sanjay Rathore

मुंबई :- पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये वनमंत्री असलेले संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. राठोड यांचे थेट नाव घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने सावध भूमिका घेतली आहे .

आत्महत्या प्रकरणात कुठल्याही नेत्याचं कोणीही नाव घेत नाही. कोणत्याही नेत्याचा कसलाही संबंध नाही. या प्रकरणात सत्य काय ते चौकशीअंती समोर येईल, असे म्हणत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी संजय राठोड यांचा अप्रत्यक्षपणे बचाव केला. या आत्महत्या प्रकरणात कुठल्याही नेत्याचे कोणीही नाव घेत नाही. कोणत्याही नेत्याचा कसलाही संबंध नाही. या प्रकरणात सत्य काय ते चौकशीअंती समोर येईल.

भाजपच्या नेत्यांना खोटं बोलण्याची सवय आहे. हा त्यांचा धंदा आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीसुद्धा सीडी बाहेर काढणार असल्याचे म्हटले होते. पण आम्हाला हे योग्य वाटत नाही. एकमेकांवर चिखलफेकीचे प्रकरण बंद झाले पाहीजे, असे मलिक म्हणाले.

ही बातमी पण वाचा : संजय राठोड यांची हकालपट्टी करा, भाजपची जोरदार मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER