मुंबई इंडियन्ससारखे यश इतर कुणाचेच नाही…

Mumbai Indians

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आयपीएलमधील (IPL) सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी सर्वाधिक चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्या लौकिकाला साजेसा खेळ करतच त्यांनी यंदासुध्दा विजयी चौकार लगावून पदकतक्त्यात आघाडी घेतली आहे.

यंदा जबर फाॕर्मात असलेल्या आणि प्रथमच विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये गणल्या जाणाऱ्या दिल्ली कॕपिटल्सला (Delhi Capitals) त्यांनी रविवारी 5 गड्यांनी मात दिली आणि एक अनोखा विक्रम केला. तो म्हणजे आयपीएलमधील सर्व संघांविरुध्द त्यांनी सामने जिंकायची टक्केवारी 50 टक्क्यांच्या वर नेली आहे म्हणजे प्रत्येक संघाविरुध्द त्यांनी निम्मेपेक्षा जास्त सामने जिंकले आहेत आणि अशी कामगिरी करणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे.

त्यांचा हा पराक्रम कसा ते बघू या…

विरूध्द —— विजय/पराभव — टक्के यश
केकेआर —- 20 / 06 ———- 76.92
आरसीबी — 18 / 10 ———- 64.28
सीएसके —- 18 / 13 ———- 58.06
किंग्ज इले. – 14 / 12 ———- 53.84
एसआरएच – 08 / 07 ———- 53.33
आरआर —- 12 / 11 ———- 52.17
डीसी ——— 13/ 12 ———- 52.00

एवढंच नाही तर मुंबई हा आयपीएलमध्ये 100 च्यावर सामने जिंकणारा संघ आहे. त्यांच्याशिवाय चेन्नई सुपर किंग्जने असे विजयांचे शतक केले आहे.पण या दोन संघांशिवाय असा तिसरा संघ नाही.

मुंबई व चेन्नईच्या विजयांचे शतक कसे ते बघू या…

वर्ष —– चेन्नई — मुंबई

2008 — 9 ——– 7
2009 — 8 ——– 5
2010 — 9 ——– 11
2011 — 11——- 10
2012 — 10 ——-10
2013 — 12 ——- 13
2014 — 10 ——- 7
2015 — 10 ——- 10
2016 — —- ——- 7
2017 — —- ——- 12
2018 — 11 ——- 6
2019 — 10 ——- 11
2020 — 2 ——— 5
एकूण — 102 —— 114

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER