कोणीही श्रेयसाठी घोषणा करणे योग्य नाही; थोरातांनी शिवसेना-राष्ट्रवादीला फटकारले

Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मोफत लसीकरणाचे (Corona Free Vaccine) श्रेय घेत आहेत. यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन्ही पक्षांना फटकारले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नि:शुल्क लसीकरणाच्या निर्णयाची घोषणा करण्याआधी त्याचे श्रेय घेणे योग्य नाही, अशा पद्धतीचे श्रेय घेण्यावर काँग्रेसची नाराजी आहे, असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे.

“मोफत लसीकरणाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. नागरिकांना मोफत लस द्यावी हा काँग्रेसचा आग्रह आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) तसा आग्रह धरला आहे. आमची मागणी मान्य होईल, अशी आशा आहे. मुख्यमंत्री मोफत लस देण्याबाबत विचार करत आहे. यासाठी श्रेय घेण्यासाठी कोणी हा निर्णय जाहीर करत असेल, तर ते चुकीचे आहे. यावर काँग्रेसची तीव्र नाराजी आहे. मोफत लसीकरणाच्या श्रेयाची लढाई सुरू आहे, ती योग्य नाही. हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला पाहिजे. कोणीही श्रेयसाठी घोषणा करणे योग्य नाही.” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

मोफत लसीकरणावेळी गर्दी होण्याची शक्यता

आधी ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसी दिली जात होती. यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक होती. नोंदणी करूनही लसीसाठी गर्दी होताना दिसली. आता १ मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तिंना लस दिली जाणार आहे. या वयोगटातील व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता अधिक आहे. यावेळी गर्दी वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. याबाबत सरकारने नियोजन केले पाहिजे, असेही थोरात म्हणाले.

१८ वर्षांवरील व्यक्तिंना लस दिल्याने संभाव्य गर्दी टाळण्यासाठी नियोजनाबाबत मी मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात धोरण ठरवले जाण्याची शक्यता आहे. सर्वांना मोफत लस मिळावे यासाठी केंद्राने मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button