“कोणीही जिंको पण अशा विजयाचा काहीच फायदा नाही” : कपिल सिब्बल

Kapil Sibbal

नवी दिल्ली :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४ राज्ये आण‍ि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांसाठी मतदान पार पडले. आज त्यांची मतमोजणी होणार असून मतदारांनी कोणाला कौल दिला, हे उघडकीस होणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू आहे. सोबतच निवडणूक आयोगाने कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. आसाममध्ये ३ तर पश्च‍िम बंगालमध्ये सर्वाधिक ८ टप्प्यांमध्ये मतदान झाले. या दरम्यान काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी विधान केले आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आण‍ि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. “कोणीही जिंको पण अशा विजयाचा काहीच फायदा नाही. आताच्या काळात लोकांचा जीव वाचवणे हे महत्त्वाचे आहे.” असे कपिल सिब्बल म्हणाले.

मतदानानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोल्समध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप आण‍ि तृणमूल यांच्यात काटे की टक्कर होणार आहे, असा एकंदरीत अंदाज वर्तविण्यात आला आहे. ममता बॅनर्जीच सरकार स्थापन करतील, अशी शक्यता एक्झिट पोल्समधून व्यक्त केली आहे. आसाममध्ये भाजप आणि केरळमध्ये डावी आघाडी सत्ता कायम राखतील. तामिळनाडूत सत्तांतर होऊन डीएमके सत्ता स्थापन करेल, असा अंदाज आहे. पुदुच्चेरीमध्येही सत्तांतर होऊन एनडीए सरकार स्थापन करेल, असा अंदाज वर्तविला आहे.

मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी निर्बंध लावले आहेत. उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रांवर प्रवेशासाठी RT-PCR किंवा रॅपिड अँटिजन चाचणी निगेटिव्ह बंधनकारक केली आहे. निकालानंतर विजयी मोर्च्यांवर बंदी घातली आहे. याशिवाय विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवाराने दोनपेक्षा अधिक व्यक्ती सोबत नेऊ नयेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button