मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कोल्हापूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आज मुंबईला येतील. यावर, मुंबईतून बॉलिवूड कोणीही बाहेर नेऊ शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे बॉलिवूडप्रमाणे (Bollywood) एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरू करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.

बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप सध्या राज्यातील महाआघाडीचे सरकार करते आहे. त्यावर प्रसारमाध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Chandrakant Patil On Parallel Bollywood Industry in UP)

बॉलिवूड किंवा असा कोणत्याही उद्योग ज्यामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्माण होतो, तो कुठेही नेण्याचं कारण नाही. एखाद्यावेळी ते अशाच प्रकारचा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा यासाठी अभ्यासासाठी येत असावेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ते मुंबईतून बॉलिवूड ते नेऊ शकत नाही. मुंबईतील सुविधा इतर ठिकाणी मिळने फार अवघड आहे. पण सुविधा उपलब्ध करुन एखादा उद्योग सुरू करण्याला काही आक्षेप असण्याचं कारण नाही, असे ते म्हणालेत.

योगी आदित्यनाथ यांचा दौरा
योगी आदित्यनाथ उद्या (२ डिसेंबर) रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. १ डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील. १ डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचतील. त्यानंतर २ डिसेंबर रोजी ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. योगी त्यांच्या दौऱ्यात महाराष्ट्रातील उद्योगपती, तसेच बॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांसोबत बैठक घेतील. उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे आवाहन करतील. रतन टाटा, आदित्य बिर्ला असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER