कुणी माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, अजित पवारांचे विरोधकांना आव्हान

Chandrakant Patil-Ajit Pawar

पुणे :- महाविकास आघाडीचे सरकार केव्हाही पडू शकते, असे भाकीत सतत भाजप नेते करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीचे सरकार पहाटे कोसळणार असल्याचे म्हटले होते. राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहेत. एक दिवस सर्वजण झोपेत असताना हे सरकार गेलेलं असेल, चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

पुण्यात कोरोना स्थिती संदर्भातील आढावा बैठक संपल्यावर पत्रकारांशी चर्चा करताना अजित पवार म्हणाले, हे सरकार झोपेत असताना पडेल असं चंद्रकांत पाटील म्हटले तेंव्हापासून मी दररोज झोपेतून जागा होतो आणि टीव्ही लावून बघतो सरकार आहे का पडलं. यानंतर अजित पवार यांनी थेट विरोधकांना आव्हान देत म्हणाले, कुणी माईचा लाल हे सरकार पाडू शकत नाही.

यापूर्वी सुद्धा अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर भाष्य करत म्हटलं होतं की, महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर अजित पवार म्हणाले होते की, चंद्रकांत पाटील हे झोपेत असताना बोलले असतील.

दरम्यान, लॉकडाऊनच्या बाबतीत शिथिलता देण्याचा निर्णय ज्या भागात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या आत आहे त्यासाठी असणार आहे. काल समज- गैरसमज झाले. थोड्या वेगळ्या बातम्या आल्या. पण उद्धव ठाकरे यांचाच निर्णय अंतिम राहणार आहे. तसेच पुणे शहरात पॉझिटिव्हीटी रेट ५ पर्यंत आला आहे. त्यामुळे सोमवारपासून पुणे, पिंपरी चिंचवडबाबत वेगळे धोरण अवलंबिले जाणार आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

ही बातमी पण वाचा : पवारांनी अनेक हल्ले, वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, अजित पवारांचा विरोधकांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button