सावरकरांचे स्वातंत्र्यासाठी असलेले योगदान कोणालाही नाकारता येणार नाही’ – अजित पवार

No one can deny veer Savarkar contribution - Ajit Pawar

मुंबई :- राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५४ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी गौरव आणि सन्मानदर्शक ठराव मांडण्याची मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान करून चेंडू काँग्रेस आणि शिवसनेच्या कोर्टात ढकलला आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून सावरकारांचा गौरव ठराव मांडण्यात येणार का?, असा प्रश्न अजित पवार याना पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देतांना ते म्हणाले की, ‘चांगल्या व्यक्तीच्या संदर्भात एखादी चर्चा येणार असेल तर कुणाला आक्षेप असण्याची हरकत नाही. गेल्या ३० वर्षांत मी अनेकदा अशा चर्चांमध्ये भाग घेतला आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत व अन्य काही गोष्टींमध्ये सावरकरांचे योगदान आहेच. सावरकरांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. हयात नसलेल्या व्यक्तींबद्दल अनावश्यक विधानं करून गैरसमज पसरवण्याचं काही कारण नाही. सर्व पक्षांचे एकमत असेल तर, विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सावरकरांचा गौरव ठराव मांडण्यास काहीच हरकत नाही. ‘ असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, त्यांच्या या विधानाला काँग्रेस आणि शिवसेना कश्याप्रकारे उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बाळासाहेब थोरातांची सावरकरांना श्रद्धांजली


Web Title : No one can deny veer savarkar contribution freedom – Ajit Pawar

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)