शरद पवारांना कोणतीही नोटीस बजावली नाही- निवडणूक आयोगाची माहिती

Sharad Pawar - Election Commission.jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाकडून Income (Tax Department) नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे . पवारानी स्वतः यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली .मात्र निवडणूक आयोगाकडूनच अत्यंच महत्त्वाची माहिती देत पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुनच आयकर विभागानं शरद पवार यांच्या नावे नोटीस पाठवली होती असे वृत्त काही माध्यमांनी चालवलं. शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचं यात म्हटलं गेल्याची माहिती समोर आली. पण, निवडणूक आयोगानं असा कोणताही इशारा दिला नसल्याचं आता स्पष्ट करण्यात आलं आहे.

२००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचं म्हटलं गेलं होतं. नोटीस आल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी पत्रकार परिषदेत यावर प्रतिक्रियाही दिली होती.

तसेच खासदार सुप्रिया सुळेंनाही काल संध्याकाळी नोटीस येणार होती. मात्र, पहिली नोटीस मलाच आली, हे चांगले झाले. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आयकर विभागाने ही नोटीस पाठवल्याचे मला समजले. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा मला आनंदच’, अशी खोचक टिप्पणी पवारांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER