फडणवीसांकडे लक्ष देण्याची गरज नाही – अनिल देशमुख

Anil Deshmukh & Devendra Fadnavis

पुणे :- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीका करत असतात. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असल्याने आम्ही चांगलं काम केलं तरी टीकाच करतच राहणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी लगावला आहे. अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

येरवडा कारागृहबाबत काही मागण्या होत्या. त्याबाबतचं निवेदन यावेळी अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आलं. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती यावेळी अनिल देशमुख यांनी दिली.

भिडे, एकबोटे यांच्यावर योग्यरीत्या कारवाई होईल आणि चार्जशीटचा प्रस्ताव देखील मंजूर केला गेला आहे. तसंच बी. जी. कोळसे पाटलांची सुरक्षा का काढली याचा आढावा घेत असल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान याआधी सुबोध कुमार जैस्वाल यांच्यावरून तुम्हाला देवेंद्र फडणवीस हे लक्ष करीत आहे असं विचारलं असता ते म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता आहेत. त्यामुळे जे काही आमच्या बद्दल बोलणार ते विरोधातच बोलणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एवढं काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही.

ही बातमी पण वाचा : ‘हॅलो, मी गृहमंत्री बोलतोय’, कंट्रोल रुममध्ये फोन करणाऱ्या पुणेकरांशी अनिल देशमुख यांचा  संवाद 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER