… ५४ वर्षांच्या पप्पूकडे बघण्याची गरज नाही, गोविंददेव गिरी महाराजांची राहुल गांधींवर टीका

Rahul Gandhi -Govinddev Giri Maharaj

पुणे : १४ वर्षांचा शिवाजी वाचा ५४ वर्षांच्या पप्पूकडे बघण्याची गरज नाही, काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर अशी टीका श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज (Govinddev Giri Maharaj)यांनी केली.

भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या ‘अयोध्या’ (Ayodhya)या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. गोविंदगिरी महाराज आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला.

अयोध्या हे शिकण्याचे केंद्र आहे. मंदिराला दिव्यत्वाची सीमा नसणार आहे. राम मंदिराचा संघर्ष हा रोमांचक आहे. संन्यासी, नागा साधू आणि तीन लाख लोकांनी बलिदान दिले आहे. राम हा देशाचा कस आणि बळ आहे. जोपर्यंत रामाचे चिंतन आहे, तोपर्यंत हा देश बलवान आहे, असे गोविंदगिरी महाराज म्हणाले (Govinddev Giri Maharaj slams Rahul Gandhi).

छपत्रतींच्या प्रतिमेचा काहींनी मेकअप केला आहे तर काहींची ती मूळ प्रेरणा आहे. राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूचे सैनिकीकरणाची प्रभू रामचंद्रांची प्रतिमा आहे, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील

६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मस्जिद पाडल्यावर इतर ठिकाणी त्याचे पडसाद उमटलेत. जम्मू काश्मीर आणि देशात विविध ठिकाणी मंदिरे पाडली गेली. रामजन्मभूमी हे मंदिर नाही तर स्वाभिमानावर झालेला आघात आहे. आक्रमकांनी दोन गोष्टी पाहत आक्रमण केले एक म्हणजे मंदिर आणि दूसरी स्त्री. कारण आपल्या समाजाची या दोन गोष्टींवर खूप श्रद्धा आहे. आक्रमकांनी हिंदू समाज मोडून काढण्याचे काम केले, आम्ही त्याला प्रत्युत्तर देत आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

अनेक जण टीका करतील. त्यांना पुन्हा एकदा त्यांना आधीचे राज्य आणायचे आहे. मात्र मंदिर हे नवनिर्माणाचे केंद्र आहे. आमच्या अस्मितेवरचा घाला घातला गेला. त्याला आम्ही मंदिर उभारून प्रत्युत्तर देणार आहोत. एक लाख रुपयांचा निधी देणाऱ्यांना अयोध्या हे पुस्तक निःशुल्क भेट दिले जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

गेली चाळीस-पन्नास वर्षे रामजन्मभूमीला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. रामजन्मभूमी, रामजन्मभूमी आंदोलन, संघटना यांना बदनाम केले. ही एक वैचारिक लढाई आहे, असे माधव भंडारी म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER