उद्योगांमध्ये अवाजवी हस्तक्षेप नको – नटराजन चंद्रशेखरन

मुंबई : विकासाला चालना देण्यासाठी उद्योग धंद्यांमधील अवाजवी हस्तक्षेप, नियंत्रण, संशयी दृष्टिकोन यासारखे अडथळे दूर करणे आवश्यक आहे, असे मत टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी व्यक्त केले.

नानी पालखीवाला स्मृती व्याख्यानमालेत बोलताना ते म्हणाले की, उद्योजकांना टार्गेट देऊन विकास गतिमान होणार नाही. विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी तशा प्रकारचा दूरदृष्टीकोन आणि सकारात्मक वातावरण तयार करणे आवश्यक आहे. सरकारने इज ऑफ डुईंग बिझनेसला प्राध्यान दिले आहे. मात्र आपण पुन्हा एकदा विकास आणि अर्थव्यवस्थेबाबत फेरविचार केला पाहिजे. बिझनेस कल्चर हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. उद्योजकांना टार्गेट देऊन, त्यांच्या सतत मागे लागून विकासदर वाढणार नाही. लोकांना पाठी लागून विकासाची गंगा येणार नाही. त्यासाठी उद्योगातील अडथळे दूर करावे लागतील.

उद्योगांवरील नियंत्रणावर टीका करताना चंद्रशेखरन म्हणाले की, नियंत्रण उद्योगांवर देखरेख ठेवण्यासाठी असावे पण त्यासाठी उद्योगांकडे संशयाने पाहण्याची वृत्ती नसावी. अर्थव्यवस्थेतील जोखीम वाढली आहे. यातून विषमताही प्रचंड वाढली आहे. तरुणांना रोजगार देण्याला प्राधान्य दिले पाहिजे. नव्या दशकात सुमारे ९ कोटी तरुण उमेदवार नोकऱ्यांसाठी उपलब्ध होणार असून त्यांना नोकऱ्या देण्याचे आव्हान आहे