प्राप्तिकर रिटर्न भरण्यास आणखी मुदतवाढ नाही सरकार म्हणते आम्हाला आता महसूल हवा

CBDT & Tax Return

नवी दिल्ली : सन २०२०-२१ या करनिर्धारण वर्षासाठीचे प्राप्तिकर रिटर्न व लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यास यापुढे आणखी  मुदतवाढ दिली जाणार नाही, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मंगळवारी जाहीर केले. याआधी दिलेल्या मुदतवाढीनुसार विनालेखापरीक्षणाचे रिटर्न भरण्यास १० जानेवारी, लेकाफरीक्षणासह रिटर्न भरण्यास १५ फेब्रुवारी तर टॅक्स ऑडिटसाठी १५ जानेवारी, २०२१ अशा अंतिम तारखा होत्या. या मुदती आणखी वाढवून द्याव्यात अशा विनंतीची अनेक निवेदने मंडळाकडे करण्यात आली होती. त्या निवेदनांवर मंडळाने १२ जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा, असे निर्देश गुजरात उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिले होते. त्यानुसार मंडळाने सर्व निवेदने अमान्य करून यापुढे कोणताही मुदतवाढ न देण्याचा निर्णय जाहीर केला.

या संदर्भात जारी केलेल्या एका निवेदनात ‘सीबीडीटी’ म्हणते, उत्पन्नाचे रिटर्न व लेखापरीक्षण अहवाल वेळेवर सादर करणे हा करदात्यांच्या कर्तव्याचा महत्वाचा भाग आहे व हे करणे अमर्याद काळासाठी लांबविले जाऊ शकत नाही. प्राप्तिकर विभागाची अनेक कामे करदात्यांनी रिटर्न सादर केल्यानंतरच सुरु होणारी असतात. रिटर्न दाखल झाल्यानंतर योग्य करआकारणी व त्याची वसुली केली जाऊ शकते.

निवेदन पुढे म्हणते की, आत्ताच्या कठीण काळात करवसुलीला नेहमीपेक्षा जास्त महत्व आहे. कारण गरिबांच्या कल्याण योजना व अन्य जबाबदाºया पार पाडण्यासाठी सरकारला महसुलाची गरज आहे. ही कामे कराव्गारे मिळणाºया निधीतूनच केली जात असल्याने करवसुलीत होणाºया विलंबाने ही कामे करण्यात अडचण येते.

याआधी मुदतवाढी देऊन करदात्यांना पुरेशी सवलत दिली आहे व बहुसंख्य करदात्यांनी या वाढीव मुदतीत रिटर्नही सादर केले आहेत. किंबहुना यंदा वाढीव मुदतीत सादर झालेल्या रिटर्नची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त आहे, असेही सरकारने नमूद केले. एवढेच नव्हे तर कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर झाला असला तरी मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतात करदात्यांना रिटर्न सादर करण्याच्या बाबतीत अधिक सवलत देण्यात आली आहे, असेही हे निवेदन म्हणते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER