
आता क्रिकेटच्या सामन्यात पंच गोलंदाजाची टोपी सांभाळणार नाहीत आणि चेंडू तपासतानासुध्दा त्यांनी हातात ग्लोव्हज घातलेले असतील. कोरोना संकटानंतर जेंव्हा खेळ पुन्हा सुरु होईल तेंव्हा काय काय खबरदारी घ्यायची याचे धोरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने जाहीर केले आहे. त्यात पंचांसाठीसुध्दा बंधने असणार आहेत. खेळाडूंना बियरच्या बाटल्या नेहमी ड्रेसिंग रुममध्येच आणि बर्फावरच ठेवाव्या लागणार आहेत. आयसीसीच्या वैद्यकीय सल्लागार समितीने या सूचना केल्या आहेत.
चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास आणि तटस्थ पंचांची सेवा घेण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे. याशिवाय खेळाडूंनाही आता काही सवयी बदलाव्या लागणार आहेत.
सोशल डिस्टन्सिंगचे बंधन राहणार असल्याने फलंदाज बाद केल्यावर केले जाणारे हडल आता बंद होईल. याशिवाय सामन्याच्या आधी आणि नंतर संघांनी चेंजिंग रुममध्ये कमीत कमी वेळ घालवावा अशीही शिफारस करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार असल्याने गोलंदाजांना आता गोलंदाजी करण्याआधी पंचांकडे टोपी, स्वेटर, चष्मा किंवा इतर वस्तु सोपविण्याची सवय सोडून द्यावी लागणार आहे. याशिवाय खेळाडूंनाही त्यांच्या वस्तू, जसे हेल्मैट, ग्लोव्हज, पॅड , टोपी, एकमेकांकडे सोपविता येणार नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला