बिहार निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मतांच्या मोजणीत फरक नाहीः निवडणूक आयोग

Election Commission Of India

नवी दिल्ली :- निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) बुधवारी म्हटले आहे की, गेल्या महिन्यात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मतदार सत्यापित पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएटी) आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे नोंदवलेल्या मतांच्या मोजणीत कोणताही फरक आढळला नाही. बिहारच्या १,२१५ मतदान केंद्रांमध्ये, व्हीव्हीपॅट स्लिपची मोजणी ईव्हीएम मतांच्या मोजणीसाठी केली गेली. आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘ते (व्हीव्हीपीएटी) ईव्हीएम मोजणीशी पूर्णपणे जुळतात.’ व्हीव्हीपॅटला ईव्हीएम मोजणीसाठी प्रत्येक विधानसभा जागांवर पाच मतदान केंद्रे निवडली जातात. २०१७ गोवा विधानसभा निवडणुकीपासून या मशीन्सचा वापर सर्व ईव्हीएममध्ये केला जात आहे.

एनडीएने २४३ सदस्यांच्या विधानसभेत १२५जागा जिंकल्या. विरोधी पक्षातील महाआघाडीने ११० जागा काबीज केल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांचा चौथ्या कार्यकाळात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडीला धक्का, धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER