राज ठाकरेंसोबत ‘नो पंगा’, डॉमिनोजने मनसेच्या मागणीची घेतली तत्काळ दखल; लवकरच मराठीत अ‍ॅप्लिकेशन

अ‍ॅमेझॉननंतर मराठीसाठी मनसेचा मोर्चा आता डॉमिनोजकडे

Raj Thackeray-Dominos

मुंबई :- इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषेचाही पर्याय असावा यासाठी मनसेने अ‍ॅमेझॉनकडे (Amazon) मागणी केली होती. मनसेच्या या मागणीनंतर अ‍ॅमेझॉनने राज ठाकरेंनाच नोटीस पाठवण्याचे काम केले होते. मात्र, राज ठाकरे यांनी अ‍ॅमेझॉनला धडा शिकवलाच व अखेर अ‍ॅमेझॉनला मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावाच लागला. अ‍ॅमेझॉननंतर आता मनसेने मराठीसाठी आपला मोर्चा डॉमिनोजकडे (Dominos) वळवला आहे. मात्र, डॉमिनोजने मनसेच्या मागणीची तत्काळ दखलदेखील घेतली आहे.

डॉमिनोजच्या अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही. तसा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. (Include Marathi language in Domino’s app Raj Thackeray’s MNS warning)

डॉमिनोजच्या प्रशासनाने मनसेच्या या मागणीची दखलही घेतली आहे. आम्ही लवकरच अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन डॉमिनोजने मनसेला पत्राद्वारे दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसेने अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आंदोलन सुरू  केले होते. सुरुवातीला मनसेने पत्रं, इशारे आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून या मुद्द्याचा पाठपुरावा केला. मात्र, अ‍ॅमेझॉनने याविरोधात न्यायालयात धाव घेत राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसे प्रचंड आक्रमक झाली होती.

त्यानंतर मनसेने मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये अ‍ॅमेझॉनची कार्यालये आणि गोदामांची तोडफोड करण्याचा सपाटा लावला होता. मनसेच्या या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनने शरणागती पत्करत सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. हा सर्व प्रकार पाहता डॉमिनोजने अगोदरच मनसेसमोर शरणागती पत्कारल्याचे चित्र दिसत आहे.

डॉमिनोज मराठी अ‍ॅप सुरू करणार

अ‍ॅमेझॉन, स्विगी, झोमॅटोनंतर आता डॉमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनेदेखील आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि डॉमिनोजला पत्र देणारे मनसे उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर यांना पत्र देऊन आपण मराठीत अ‍ॅप्लिकेशन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईत अ‍ॅमेझॉनविरुद्ध मनसे वाद पेटला; नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सुरू  केलेल्या मोहिमेने आता आक्रमक स्वरूप धारण केले होते. मनसेकडून (MNS) मुंबईभरात अ‍ॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले होते. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER