काही झाले तरी अटलजींचा पुतळा उभारणारच ; भाजपचे राज्य सरकारला खुले आव्हान

Uddhav Thackeray - Atal Bihari Vajpayee - Atul Bhatkhalkar

मुंबई : कांदिवलीत काही झाले तरी अटलजींचा पुतळा उभारणारच, हिंमत असेल तर सरकारने आम्हाला अडवून दाखवावे, असे खुले आव्हान भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारला दिले आहे.

स्व. अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या पुतळ्याला महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) पुढील तीन महिन्यात रीतसर परवानगी न दिल्यास, भारतीय जनता पक्षाचे हजारो कार्यकर्ते ‘कारसेवेच्या’ माध्यमातून श्रद्धेय अटलजींचा पुतळा त्या ठिकाणी उभारतील, असा इशाराही भातखळकर यांनी दिला.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या संसदेतील पहिल्या भाषणाच्या नंतर 1957 मध्ये देशाचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्तुती करताना म्हणाले होते की ‘अटलजी अत्यंत प्रभावी असून एक दिवस नक्कीच या देशाचे प्रधानमंत्री होतील’. अशा अजातशत्रू स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा व त्यांच्या पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमाला असहिष्णू महाविकास आघाडी सरकारने विरोध करून अत्यंत घाणेरडे राजकारण चालविले आहे.

केवळ विरोध करून हे सरकार थांबले नसून या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशा सूचना सुद्धा केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना देण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकीही देण्यात आली आहे. तसे धमकीचे पत्रच राज्य सरकारने दिले आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिम, झाकीर नाईक यांसारखे आतंकवादी व देशद्रोही आपलेसे वाटणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आयुष्यभर राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या स्व. अटलजींच्या पुतळ्याबद्दल विरोध करणे स्वाभाविकच असल्याची टिप्पणीही यावेळी अतुल भातखळकर यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER