कितीही झाकले तरी सत्य लपणार नाही! “ये पब्लिक है, ये सब जानती है! ; भाजप नेत्याचा शरद पवारांना टोला

Praveen Darekar-Sharad Pawar Maharashtra Today

मुंबई :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे पत्र तथ्यहीन असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी केलेल्या या विधानावरून, आता भाजपा नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे.

ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख (Anil Deshmukh) करोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?”, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलेला आहे. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी टीका केली आहे.

अनिल देशमुखांना वाचवायचचं, असा निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला दिसतोय!१५ फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती, क्वारंटाईन काळात घेता येते ? कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही! “ये पब्लिक है, ये सब जानती है!” असे दरेकर यांनी ट्विट केले आहे.

आपल्या ट्विटसोबत दरेकर यांनी अनिल देशमुख यांचं १५ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकारपरिषदेचं ट्विट देखील जोडलं आहे. तसेच, ”खरंच….स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात? थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा! असे देखील दरेकर यांनी ट्विट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER