कोणी कितीही आदळआपट केली तरी ते पोलिसांच्या कर्तृत्वाला डाग लावू शकणार नाहीत – मुख्यमंत्री ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई :- नव्या वर्षाचा पहिला दिवस उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तालयाला (Mumbai Police Headquarter)भेट देऊन व तेथील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन साजरा केला. यावेळी बोलताना, ‘मध्यंतरी काही लोकांनी पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण, पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्याला तोड नाही. ही परंपरा १०० ते १५० वर्षांची आहे. त्यामुळंच कोणी कितीही आदळआपट केली तरी ते पोलिसांच्या कर्तृत्वाला डाग लावू शकणार नाहीत,’ असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विरोधकांना टोला हाणला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तालयात जाऊन पोलिसांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला. त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ‘पोलीस दक्ष राहतात. काम करतात म्हणून आम्ही सण साजरे करू शकतो. या जाणिवेतून मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून पोलिसांचे आभार मानायला आलो आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पोलीस खात्यात ठाकरे सरकारच्या हस्तक्षेप … – फडणवीसांची टीका

संचारबंदी आणि जमावबंदी यात फरक आहे, ते तुम्ही सांगितलं ते बर झालं, मुद्देमाल परत करता ही मोठी गोष्ट आहे, तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, तुमचा प्रत्येक क्षण ताणतणावात असतो, माझ्या बहाद्दर लोकांच्या सोबत वेळ घालवायला मी आलो आहे, तुमचं कर्तृत्व मोठं आहे, तुमचं कर्तृत्व हे सूर्य प्रकाशा इतकं स्वच्छ आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची पाठ थोपटली आहे.

वर्क फ्रॉम होम पोलिसांनी केलं असतं तर काय झालं असतं? – मुख्यमंत्री

वर्क फ्रॉम होम करा हे मीच सांगितलं, पण जर पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर काय झालं असतं?, अजूनही धोका गेलेला नाही, इतर देशांमध्ये हा धोका आणखी वाढला आहे, त्यामुळे जर सर्व उघडलं तर ते चुकीचं ठरेल

काही पोलीस कोव्हिडने शहीद झालेत – मुख्यमंत्री

काही पोलीस कोव्हिडने शहीद झालेत, काही हजार पोलिसांना कोरोनाने ग्रासलं, त्यांना कुटुंब नाही का, ते का शहीद झाले.

पोलीसही माणसं आहेत, पण तरी तुम्ही दक्ष राहाता, म्हणून आम्ही सण साजरे करु शकतो, त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून तुमचे आभार मानायला आलो आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER