‘कितीही आटापिटा करा, मी अडकणार नाही’, जामीन मिळाल्यानंतर संजय काकडे गर्जले

Sanjay Kakade - Maharastra Today
Sanjay Kakade - Maharastra Today

पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीप्रकरणी भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांना आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक केली होती. दुपारी त्यांना शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर ‘कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही’ अशी प्रतिक्रिया काकडे यांनी दिली. तसेच आगामी पालिकेच्या निवडणुका लक्षात घेता हे राजकारण केलं जात असल्याचा आरोप काकडे यांनी केला.

दरम्यान, कुख्यात गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी संजय काकडे यांनी गाड्या पुरवल्याच्या माहितीवरून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना अटक करण्यात आली होती. संजय काकडे यांना आज दुपारी न्यायालयात हजर केलं गेलं. शिवाजीनगर सत्र न्यायालयानं संजय काकडे यांना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button