महापालिकेचा निर्णय : मास्क नाही, भाजीपालाही नाही !

No Mask No Vegetabel

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यापुढे शहरातील सर्वच भाजी विक्रेत्यांनी मास्क नाही-भाजीपाला मिळणार नाही. मास्कशिवाय किराणा दुकानांत वस्तू देऊ  नयेत, अशी सक्ती जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच केली आहे. आता भाजी खरेदी आणि विक्रीसाठी मास्क सक्ती करून त्यासाठी कठोर कारवाई करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे.

भाजी व फळविक्रेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व हॅण्डग्लोज वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असून भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मास्क व सामाजिक अंतराचे पालन केल्याशिवाय भाजीपाला तसेच फळांची विक्री करू नये, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. शहरात सुमारे १५ ठिकाणी भाजी विक्री केली जाते. याशिवाय रस्त्याच्या कडेला भाजी विक्री होते. या सर्व ठिकाणी महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. मास्क न वापऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER