विनामास्क : कोल्हापूरकरांनी तीन दिवसात पावणे दोन लाखाचा दंड

Dr Mallinath Kalshetti - No Mask Fine

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) शहरात विना मास्क (Mask) फिरणे, सामाजिक अंतर (Social Distancing) न ठेवणे, हॅण्डग्लोज न घालणा-या दुकानदार, व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून गेल्या तीन दिवसात 1 लाख 45 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी (Dr Mallinath Kalshetti) यांनी दिली.

यामध्ये 19 सप्टेंबर रोजी 57 हजार 900, 20 सप्टेंबर रोजी 44 हजार 800, 21 सप्टेंबर रोजी 42 हजार 800 रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरवासीयांनी तसेच व्यापारी, व्यावसायिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER