कोल्हापुरात लॉकडाऊन नाही : सतेज पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन केले जाणार नसल्याची पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे कोल्हापूरध्ये 10 दिवस लॉकडाऊन होणार यात तथ्य नाही. त्यामुळे घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन ही ना. पाटील यांनी केले आहे. आज कोणत्याही प्रकारची बैठक घेतली जाणार नसल्याचे ही पाटील यांनी सांगीतले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसात कोल्हापुरात लॉकडाऊन होणार का याबाबत चर्चा होती. सतेज पाटील यांच्या खुलाशाने कोल्हापुरात लॉक डाऊन बाबतीत सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER