शरद पवार व निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश ; के.के.रेंजसाठी भूसंपादन होणार नाही!

Sharad Pawar-Nilesh Lanke.jpg

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील के.के.रेंजच्या (KK Range) प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिल्लीवारी केली होती . आता पवार व लंके यांच्या प्रयत्नांना यश आले आहेत . पारनेर, नगर, राहुरी तालुक्यातील जमिनीचे के.के.रेंजसाठी भूसंपादन होणार नसल्याची माहिती आहे .

बाधित गावांचेही विस्थापन होणार नाही. मात्र, लष्कराचा सराव या ठिकाणी सुरूच राहील. जनतेने घाबरून जाऊ नये. त्यामुळे भूसंपादन होऊन गावे विस्थापित होण्याच्या भीतीने घाबरू नका, असे आवाहन पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे. नगर येथे लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत तहसीलदार देवरे यांची बैठक झाली त्यावेळी त्यांना ही माहिती मिळाल्याचे देवरे यांनी पत्रकारांना सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, नगर, पारनेर या तालुक्यात के.के.रेंज विस्तारीकरणाच्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. यात बागायती जमिनी विस्तारीकरणासाठी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याविरोधात सर्व गावकरी एकवटले आहेत. पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील तेवीस गावे हे के.के.रेंज अधिग्रहण कक्षात येत असल्याने सदर गावांतील नागरिकांचे जनजिवन अस्थिर झाले आहे. मात्र के.के.रेंजसाठी भूसंपादन होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER