सुशांतच्या मृत्यूबाबत २ महिने एफआयआर नाही ! बहिणींनीविरुद्ध २ तासात गुन्हा दाखल !!

- भाजपाचे आशिष शेलार यांचा मुंबई पोलिसांना टोमणा

Ashish Shelar - Sushant Singh Rajput

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी रियाच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी दोन तासात सुशांतच्या बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) टोमणा मारला – सुशांतच्या मृत्यूबाबत २ महिने एफआयआरही दाखल न करणाऱ्या पोलिसांनी रियाच्या तक्रारीवरून सुशांतच्या बहिणींविरुद्ध २ तासात गुन्हा दाखल केला!

अटक होण्यापूर्वी, ८ सप्टेंबरला रियाने (Rhea Chakraborty) सुशांतच्या बहिणीविरूद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून सुशांतची बहीण प्रियंका सिंह, दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. तरुण कुमार आणि अन्य काही जणांविरुद्ध सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

वांद्रे पोलिसांच्या या तत्परतेवर टोमणा मारतांना आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट केले. – “रियाने अटकेच्या वेळेस वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दोन तासात सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीविरूद्ध एफआयआर दाखल झाला. परंतु सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ६५ दिवस एफआयआर दाखल का झाला नाही? रियाला हे कोण सांगते आहे ? ड्रग्ज, पब आणि पार्टी गँग?”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER