जळगाव प्रकरणात तथ्य नाही : अनिल देशमुख

Anil Deshmukh.jpg

मुंबई :- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session) आजचा चौथा दिवस आहे. या अधिवेशनात जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना विवस्त्र करून नृत्य करण्यास भाग पाडल्याचा मुद्दा बुधवारी विधानसभेत चांगलाच गाजला आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे केली.

वसतिगृहातील घटनेप्रकरणी सहा महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे समिती गठन केली होती. घटनेची चौकशीकरून अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल गृहमंत्र्यांकडे दिला. आशादीप वसतिगृहाच्या बातमीत काही तथ्य नसून ती खोटी आहे, असा दावा अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत केला. तसेच या बातमी देणाऱ्या पत्रकारावर कारवाई होणार असल्याचे देशमुखांनी सांगितले.

अनिल देशमुख यांनी सांगितले की, “वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते, त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिले. महिलांशी चर्चा केली. महिलांचे वसतिगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणते अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, विवस्त्र व्हायला लावले आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला. यामध्ये काही तथ्य नाही. अशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांने दिला आहे, तो मी पटलावर ठेवतो.”

यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी कोरोना काळात असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास कोणी परवानगी दिली? अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले की, “१७ महिलांना कविता म्हणण्याचे, गाणी गाण्याचे बंधन नाही. तिथे फक्त १७ महिला होत्या”.

भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावेळी १७ पैकी पाच मुली १८ वर्षाखालील आहे आणि त्या गर्भवती असल्याने बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची बातमी खरी आहे का? अशी विचारणा केली. यावर देशमुख यांनी हे वृत्त चुकीचे आहे. हे मुलींचे नाही तर महिलांचे वसतिगृह असल्याची माहिती दिली. शिवाय ज्या वृत्तपत्राने ही बातमी दिली. त्यांच्यावर कारवाई करू असेही अनिल देशमुख म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER