कर्नाटकातील सौंदत्तीच्या यल्लमा मंदिरात प्रवेशबंदी

बेळगाव : कर्नाटकातील सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेसाठी महाराष्ट्रातून लाखो लोक येत असतात. पण, सध्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे (Corona)रुग्ण वाढत असल्याने सर्वच भाविकांवर डोंगरावर येण्यास निबंध घालण्यात आले आहेत. काल, शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ (M. G. Hiremath) यांनी याबाबतचा आदेश जारी केला.

सुरुवातीला केवळ महाराष्ट्रातील भाविकांवर निबंधघालण्याबाबत सौंदत्ती देवस्थान समिती अध्यक्ष, आमदार आनंद मामनी आणि जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यात चर्चा झाली. पण, खबरदारी म्हणून सर्वच भाविकांना दर्शनासाठी निबंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील दोन्ही देवस्थानांमध्ये भाविकांना पूर्णपणे निबंध घालण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER