महापालिकेत नागरिकांना नो एन्ट्री

Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर (Kolhapur) महापालिकेत शहरातील सर्वच नागरिकांना पंधरा दिवस प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. फक्त कोरोनाविषयक व अत्यंत महत्त्वाचे कार्यालयीन कामकाज पार पाडण्यात यावे, असा ठरावच मंजूर करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर संजय मोहिते होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (Dr. Mallinath Kalashetti) प्रमुख उपस्थित होते. काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह इतरांनी ठराव मंजूर केला. कोल्हापूर शहरात ऑगस्टमध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मृत्यू दरातही वाढ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेस कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून फार मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. आयुक्तांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण त्यांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत.

विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाज पाहून करोना विशेष जबाबदारी सांभाळावी लागत आहे. गेल्या दोन आठवड्यांत अनेक अधिकारी कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषयी कर्तव्य पार पाडत असताना रुग्णांचे नातेवाईक, हॉस्पिटल प्रशासन यांच्याशी समन्वय साधण्याचे क्लिष्ट काम रात्री-अपरात्री वेळेची तमा न बाळगता अधिकारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंधरा दिवस महापालिकेत इतर कामांना ब्रेक देण्याचे ठरले.

ही बातमी पण वाचा : मंत्र्यांच्या ताब्यातील महापालिकेतील शिक्षकांचा शिक्षक दिनावर बहिष्कार

MT LIKE OUR PAGE FOOTER