तुमच्यावर कोणतीही आणीबाणी लादणार नाही – मुख्यमंत्री

Uddhav Thackeray.jpg

मुंबई : मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र, बंदी आणि कायदे करूनच जीवन सुरू ठेवायचे का, याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा. दिवाळीचा सण आपण सगळ्यांनी नक्की साजरा केला पाहिजे; मात्र प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवणं टाळा. फटाक्यांवर बंदी घालायची का? ती जरूर घालता येईल; पण ती मुळीच घालणार नाही. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत जसं सहकार्य केलं तसंच दिवाळीलाही करा.

घरात, इमारतीला रोशनाई करा. दिवे लावा, फटाकेही वाजवा; पण मर्यादित स्वरूपात वाजवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज जनतेशी संवाद साधताना केले. मास्क लावला नाही तर दंड भरावाच लागणार आहे. मास्क न लावणारा एक माणूस ४०० जणांना संक्रमित करू शकतो. त्यानंतर ४०० जण किती जणांना संक्रमित करू शकतात याचा विचार तुम्हीच करा.  त्यामुळे मास्क लावला नाही तर कारवाई केली जाणारच, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कोरोना गेला आहे, असं कुणीही समजू नये. त्यावर लस आलेली नाही.

त्यामुळे मास्क हेच आपलं शस्त्र आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूर, वादळ, सतत पाऊस हा येत होता. याचा दुष्परिणाम म्हणजे जमिनी खरडून गेल्या. जून ते ऑक्टोबरमध्ये राज्यातील ४१ लाख हेक्टर जमीन बाधित झाली आहे. प्राणहानी होऊ नये यासाठी आपण प्रयत्न केला. १० हजार कोटींची तरतूद अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी केलेली आहे. जमीन, शेती, फळबागांना ही मदत दिली जाणार आहे. महिनाअखेरपर्यंत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER