सामान्यांना शॉक : कोणतीही वीज बिलं माफ होणार नाही, ऊर्जामंत्र्यांचे स्पष्टीकरण

Nitin Raut

मुंबई : सर्व सामान्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही,असे स्पष्टीकरण ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज दिले. वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं नितीन राऊत यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. लॉकडाऊनकाळात (Lockdown) वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले. सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजे. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही. वापरापेक्षा वाढीव बिलं आली असतील त्याची चौकशी सुरु आहे. पण ज्यांनी वीज वापरली आहे त्यांना बिल भरावं लागेल असं नितीन राऊत म्हणाले.

वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचे वीज जोडणी कापणार नाही. योग्य बिल नसले तर त्याची तक्रार करावी मीटर पाहणी केली जाईल. राज्यात बिल सवलत याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली, पण केंद्र सरकारने मदत केली नाही. महावितरणवर (MSEDCL) ६९ हजार कोटींचे कर्ज आहे. आम्ही कर्ज काढून कामकाज करत आहोत अजून किती करणार? असा सवाल नितीन राऊत यांनी विचारला.

दरम्यान, महावितरणने वीजबिल वसुलीबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार डिसेंबर 2020 पर्यंत थकीत वीजबिले भरावी लागणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER