
मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यांना अटक झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोर बैठका सुरू आहेत.
अनिल देशमुख यांना हटवून जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे गृह खातं देण्यात येणार असल्याच्या जोरदार चर्चाही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना विचारले असता, या बाजारातल्या गप्पा असल्याचं सांगत त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी तुम्ही गृहमंत्री होणार असल्याच्या चर्चा असल्याचं त्यांना विचारण्यात आलं. तेव्हा, या बाजारातल्या गप्पा आहेत. अशा चर्चांवर विश्वास ठेवू नका, असे जयंत पाटील यांनी सांगितले . तसेच आमदारांच्या मतदारसंघातील कामं आणि आमदार निधींबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. इतर विषयांवर चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला