चर्चा नाही, कृषी कायदा मागेच घ्यावा लागेल – मेधा पाटकर

medha-patkar

मुंबई: केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यावर कोणत्याही प्रकारची चर्चाच होऊ शकत नाही. हा कायदाच मागे घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी व्यक्त केली.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, जोपर्यंत केंद्र सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत शेतकरी दिल्लीतून हलणार नाहीत. (medha patkar reaction on farmers agitation) केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाची दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे, पण कायद्यावर चर्चा होऊच शकत नाही. हा कायदा सरकारला मागेच घ्यावा लागेल.

फक्त शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही बळीराजाच्या आंदोलनात सामील झाला आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकरी इथून हालणार नाहीत. पंजाबच्या शेतकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आज १३ प्रतिनिधींना सरकारशी चर्चा करायला जायला सांगितले, असे मेधा पाटकर म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER