प्रवासी गाड्या नियमित करण्याबाबत निर्णय झाला नाही, रेल्वेची माहिती

railways

दिल्ली : करोनासाथीच्या काळात लॉकडाउ दरम्यान बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूक आता काही प्रमाणात सुरू करण्यात आली आहे पण, १ एप्रिलपासून प्रवासी वाहतूक नियमित होणार आहे, ही चर्चा चूक आहे. रेल्वेने असा निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली.

कोरोनाबाबतची परिस्थिती सामान्य होऊ लागली तशी रेल्वेकडून काही गाड्या सुरू करण्यात आल्या. आता एप्रिलपासून रेल्वेसेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने हा खुलासा केला आहे.

काही बातम्यांमधून असा दावा केला जात आहे की, १ एप्रिलपासून सर्व प्रवसी रेल्वे पूर्ण क्षमतेने धावतील. मात्र, रेल्वे मंत्रालायासोबत पीआयबीने देखील अशा बातम्यांचे खंडन केले आहे. रेल्वेने लोकांना व माध्यम संस्थांना आवाहन केले आहे की, त्यांनी रेल्वे सेवेबद्दल अशाप्रकारचे अंदाज वर्तवू नये. या संदर्भात काही निर्णय झाला तर त्याबाबत माहिती दिली जाईल.

६५ टक्क्यांपेक्षा अधिक रेल्वे सुरू असून, यामध्ये एकट्या जानेवारी महिन्यात २५० पेक्षा जास्त रेल्वेंची वाढ झाली आहे. हळूहळू आणखी वाढवल्या जातील. देशातील परिस्थिती झपाट्याने पूर्वपदावर येते आहे मात्र सर्व घटकांवर विचार केल्यानंतर, सर्व भागधारकांशी चर्चा होईल आणि त्यानंतरच रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER