काँग्रेसच्या राज्यात ‘डील’शिवाय कुठलही डील होत नव्हते, ‘कट’शिवाय कंत्राट दिले जात नव्हते – रविशंकर प्रसाद

RaviShankar Prasad

दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी आरोपी राजीव सक्सेनाने चौकशीत कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी, त्यांचा मुलगा बकुल नाथ, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद आणि अहमद पटेल यांच नाव घेतल. यानंतर केंद्रीय कायदा मंत्री व भाजपा नेते रविशंक प्रसाद काँग्रेसला टोमणा मारताना म्हणाले – काँग्रेसच्या राज्यात ‘डील’शिवाय कुठलही डील होत नव्हतं, ‘कट’शिवाय कंत्राट दिले जात नव्हते!

मंगळवारी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, जेव्हा तुम्ही सैन्याशी संबधित व्यवहारातील ‘किकबॅक’बाबत ऐकता तेव्हा तुम्हाला काँग्रेसची आठवण येईल. यूपीए सरकारमध्ये विना किकबॅक कोणतच काम होत नव्हतं. ‘डील’शिवाय कुठलंही डील होत नव्हतं, काँग्रेस नेत्यांच्या ‘कट’शिवाय कंत्राट दिलं जात नव्हतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER