राजदीप सरदेसाईंविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’ची कारवाई नाही

  • सुप्रीम कोर्टाने केला चुकीच्या नोंदीचा खुलासा

नवी दिल्ली : न्यायालयाच्या कामकाजावर टिका करणारी टष्ट्वीट केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमाननेची (Contempt of Court) को णतीही कारवाई स्वत:हून सुरु केलेली नाही, असा खुलासा न्यायालयाच्या प्रशासनाने केला आहे.

SMC 02/2021 या क्रमांकाची ‘कन्टेम्प्ट’ याचिका सरदेसाई यांच्याविरोधात न्यायालयाने स्वत:हून नोंदविल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर मंगळवारी रात्री प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याआधारे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर न्यायालयाच्या प्रशासनाने रात्री उशिरा असा खुलासा केला की, सरदेसाई यांच्याविरोधात न्यायालयाने स्वत:हून ‘कन्टेम्प्ट’ची कोणतीही कारवाई सुरु केलेली नाही. वेबसाईटवर त्यासंबंधीची नोेंद अनवधानाने प्रसिद्द झाली असून ती यथावकाश सुधारण्यात येईल.

वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाने १४ ऑगस्ट रोजी ‘कन्टेम्प्ट’बद्दल दोषी धरले व ३१ आॅगस्ट रोजी त्याबद्दल त्यांना एक रुपया दंडाची शिक्षा केली त्या दोन्ही दिवशी सरदेसाई यांनी अनुक्रमे पुढीलप्रमाणे ट्वीट केली होती: ‘ काश्मीरमधील नागरिकांच्या ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दीर्घकाळ प्रलंबित असताना सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना ‘कन्टेम्प्ट’बद्दल दोषी ठरविले’ आणि ‘प्रशांत भूषण यांना एक रुपया दंडाची शिक्षा करून न्यायालयाने स्वत:च स्वत:वर ओढवून घेतलेल्या अडचणीच्या परिस्थितीतून स्वत:ची सुटका करून घेतली’.

सरदेसाई यांच्या या टष्ट्वीटनंतर आस्था खुराना नावाच्या महिलेने त्यांच्याविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’ याचिका दाखल करण्याची परवानगी अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांच्याकडे मागितली होती. परंतु वेणुगोपाळ यांनी तशी संमती दिली नाही. तरी खुराना यांनी न्यायालयात सरदेसाई यांच्याविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’ याचिका दाखल केली. खुराना यांची ही याचिका न्यायालयाने स्वत:हून नोंदविलेली याचिका असल्याचे न्यायालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु वस्तुस्थिती तशी नाही, असा खुलासा न्यायालयाने आता केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER