आशिष शेलार यांचा टोमणा : वीज बिलात सवलत नाही; महाविकास आघाडी सरकारचा जनतेला ‘जोर का धक्का धीरे से’

ashish Shelar & Mahavikas Aghadi

मुंबई : ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सांगितले आहे. हा राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने जनतेला ‘जोर का धक्का धीरे से’ दिला आहे, असा टोमणा भाजपाचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मारला.

ते म्हणाले की, राऊत यांनी सांगितले होते की, १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना सवलत देऊ. कोरोनाच्या काळात वीज पुरवठा कंपन्यांनी मनमानी पद्धतीने मीटर रीडिंग केले. वीज बिल वाढवून पाठवली. यावर सवलत देऊ, या घोषणा लबाडाघरचे आमंत्रण जेवल्यावर खरे, या प्रकारातले ठरल्या आहेत.

अर्थमंत्र्यांनी ऊर्जामंत्रांच्या प्रस्तावाला हरताळ फासला. वीजमंत्री तोंडावर पडले आणि म्हणालेत, आम्ही वीज बिलात सवलत देऊ शकणार नाही. वीजमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल का केली, असा प्रश्न करून शेलार म्हणालेत, मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला
MT LIKE OUR PAGE FOOTER