नदालला ‘नो चॅलेंज’ १२ व्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद

Nadal

पॅरिस : निवृत्त होईल तोपर्यंत तरी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदालला कुणी हरवू शकत नाही याची पुन्हा एकदा खात्री पटली. आॅस्ट्रीयाचा डॉमिनिक थिएम आज त्याच्याविरुध्द एक सेट जिंकण्यात यशस्वी ठरला पण निकाल नेहमीप्रमाणेच नदाल विजयी असाच राहिला. ३३ वर्षीय नदालने आपल्या विक्रमी १२ व्या फ्रेंच ओपन अजिंक्यपदासाठी ६-३, ५-७, ६-१, ६-१ असा विजय नोंदवला. सलग दुसºया वर्षी थिएमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. समाधान एवढेच की गेल्या वर्षीप्रमाणे यंदा तो सरळ सेटमध्ये पराभूत झाला नाही.

हि बातमी पण वाचा : ऑस्ट्रेलियाला पाठलागात सलग १९ विजयानंतर अपयश

यासह नदालने टेनिसमध्ये एकच ग्रँड स्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याच्या आॅस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांचा विक्रम मोडला. कोर्ट यांनी ११ वेळा आॅस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. विशेष म्हणजे नदाल फ्रेंच ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीनंतर एकदाही हरलेला नाही.

नदालचे हे १८ वे ग्रँड स्लॅम आणि एकुण ८२ वे विजेतेपद ठरले. यंदा त्याने ३७ सामन्यांत जिंकलेला हा ३२ वा सामना ठरला आणि थिएमवर १३ सामन्यात त्याने नवव्यांदा मात दिली. हा सामना बरोब्बर तीन तासात आटोपला.

हि बातमी पण वाचा : भारताचा विजय ‘ऑल राउंड’ आणि परफेक्ट