कृषी कायद्यांचे आंधळे समर्थन नाहीच ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका

CM Uddhav Thackeray - Farmers

मुंबई :- मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कृषी कायद्यांवर विस्तारितपणे भाष्य केले . केंद्राने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांचे आंधळे समर्थनही आपल्याला करायचे नाही. या कायद्यांमधील त्रुटी, उणीव दूर करणे गरजेचे आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध शेतकरी नेत्यांच्या बैठकीत आपली भूमिका मांडली. यावेळी काही शेतकरी नेत्यांनीही या कायद्यांमधील उणिवांवर बोट ठेवत कायदे जसेच्या तसे स्वीकारण्यास विरोध दर्शविला तर काहींनी कायदे जसेच्या तसे अमलात आणण्याची मागणी केली.

केंद्र सरकारच्या (Central Government) या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करण्यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक सह्याद्री अतिथिगृह सभागृह येथे झाली.

शेतकरी हितासाठी आपण कोणत्याही पक्षाचे असलो तरीही एकत्र आलो पाहिजे अशी आमची भूमिका आहे. हे कायदे करण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेऊन तसेच किमान शेतकऱ्यांच्या संघटनांसमवेत अगोदर चर्चा होणे गरजेचे होते. विकास किंवा सुधारणांच्या आम्ही विरोधात नाही; पण, शेतकऱ्यांसंबंधातील यापूर्वीच्या विविध कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भातील अनुभवांची देवाणघेवाण होणे गरजेचे होते. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि मतांचा विचार करून आराखडा तयार करुन राज्यात कायद्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोक चव्हाण (Ashok Chavan), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), जयंत पाटील (Jayant Patil), दादाभुसे (Dada Bhuse), सुनील केदार (Sunil Kedar), बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER