येत्या काळात उत्तर महाराष्ट्रात भाजपा आमदार, खासदार दिसणार नाही – अनिल पाटील

Anil Patil

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपला (BJP) सोडचिठ्ठी दिली असून, ते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. त्यामुळे खडसेंच्या येण्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्याने आम्हाला बळ मिळेल. आम्ही भाजपमधून येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देवू’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अमळनेरचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर घणाघाती टीका करत ‘येत्या काळात उत्तर महाराष्ट्रात एकाही ठिकाणी भाजपा आमदार, खासदार दिसणार नाही’ असं विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मी वीस वर्ष भाजपामध्ये घालवले. ते दिवस वाया गेले. पण आता खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर खासदार रक्षा खडसेदेखील येत्या काळात विचार करतील’ असं अनिल पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER