चुकीला माफी नाही : मनपाच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट व क्लबवर कारवाई

Action on restaurants and clubs in Mumbai

मुंबई : शहरातील कोरोना (Corona) रुग्णांच्या वाढत्या संख्येने मुंबईकरांच्या (Mumbai) चिंतेत भर पडली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाने कठोर पावले उचलली आहे. नियम व आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई मोहीम सुरू केली आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनी ‘चुकीला माफी नाही’ म्हणत काल तीन प्रसिद्ध रेस्टॉरंट व क्लबवर धडक कारवाई केली. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपाने नियमावली जारी केली  आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबसाठीही नियम ठरवून देण्यात आले आहेत.

मात्र, अनेक ठिकाणी मनपाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे समोर येत आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री वांद्रे परिसरातील तीन रेस्टॉरंट आणि क्लबवर धाडी टाकल्या. या परिसरातील आयरिश हाऊस पाली हिल, खार येथील यू-टर्न स्पोर्ट्स  बार आणि कर्तार पिल्लर बार अँड रेस्टॉरंट यांची पाहणी केली. यावेळी कोविड संदर्भात मनपाने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडविले जात आहे, असे अधिकाऱ्यांना आढळून आले.

बांद्रा वेस्ट बारमध्येही १०० पेक्षा अधिक लोक विनामास्क असल्याचे आढळले. मनपाने आयरिश हाऊसकडून आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३० हजार, यू टर्न  स्पोर्ट्स   बारला २० हजार, कर्तार पिल्लर बार अँड रेस्टॉरंटला ३० हजार, तर बांद्रा वेस्ट बारला ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER