बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती नाही; राष्ट्रवादीचा निर्णय

Sharad Pawar-CM uddhav Thackeray

मुंबई : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Election) राष्ट्रवादीने (NCP) स्वबळाचा नारा दिला आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत(Shivsena) युती करणार नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकत्र असलेल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बिहारमध्ये मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढताना दिसणार आहेत. बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यासोबत जाण्याची राष्ट्रवादीची तयारी होती. आम्ही काँग्रेस आणि राजदबरोबर जागावाटपाबाबत चर्चा केली.

आम्ही केवळ चार-पाच जागांची मागणी केली होती. पण आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, राजद नेते तेजस्वी यादव यांच्याशी आम्ही चर्चा केली. बिहारमध्ये भाजप, जेडीयू यांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची गरज होती, मात्र ते शक्य झालं नाही. त्यामुळे बिहारमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत. शिवसेनेबरोबर युती करणार नसल्याचंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : ‘महाराष्ट्रात बुडण्याआधी बिहारमध्ये प्रॅक्टिस करून घ्या’, भाजपचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER