काँग्रेससोबत पुन्हा युती नाही : देवेगौडा

HD Deve Gowda

कर्नाटकात विधानसभेसाठी मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढू, काँग्रेसीसोबत युती करण्याची चूक पुन्हा करणार नाही, असे माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे.


बेंगळुरू :- कर्नाटकात विधानसभेसाठी मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढू, काँग्रेसीसोबत युती करण्याची चूक पुन्हा करणार नाही, असे माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, काही दिवसांपूर्वीच देवेगौडा यांनी सूचित केले होते, की काँग्रेससोबत युती करण्यासासाठी आम्ही अजूनही तयार आहोत. मात्र, आता ते म्हणाले की – पुन्हा ती चूक करणार नाही. सर्व निवडणुका स्वबळावर लढू.

बंडखोरी करणाऱ्या १७ आमदारांच्या मतदारसंघांत पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेससोबत युती करत निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचा सूचक इशारा देवेगौडा यांनी गुरुवारी दिला होता. मात्र, हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर अवलंबून आहे, असे ते म्हणाले होते.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसचा ‘हात’ सोडताच उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या मार्गावर?

जुलै महिन्यात एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळल्यानंतर देवेगौडा आणि सिद्धरमय्या यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. सरकार पडल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसमधील नेत्यांचा युती करण्याला विरोध आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी युतीचा निर्णय उच्च पातळीवर घेतला जाईल, असे सांगितले. काही नेत्यांनी मात्र जेडीएससोबत युती तोडण्याच्या निर्णय अगदी योग्य असल्याचं सांगत आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याचा अंदाज देवेगौडा यांनी व्यक्त केला आहे. सध्याचे भाजपचे सरकार १७ बंडखोर आमदारांच्या भरोशावर आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे देवेगौडा म्हणाले.