‘ड्रोण’ बनवून देण्यासाठी एन. एम. प्रतापला ८७ देशांमधून निमंत्रण !

NM Pratap-Drone

बंगळुरू : कर्नाटकमधील एन. एम. प्रतापने ई-कचऱ्यातील सामानाने पहिले ड्रोण बनवले. प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर आतापर्यंत त्याने ६०० पेक्षा जास्त ड्रोण बनवले आहेत. आता तर जगातील ८७ देशांनी त्याला ड्रोण बनवून देण्यासाठी निमंत्रण दिले आहे.

एन. एम. प्रताप १४ वर्षांचा होता तेव्हापासून ड्रोण उडवणे आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रसिद्ध झाला होता. १६ वर्षांचा असताना त्याने ई-कचऱ्यातून पहिले ड्रोण बनवले. त्या ड्रोणने छायाचित्रही काढता येत होते. प्रतापने सीमा सुरक्षासाठी टेलिग्राफी, ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी ड्रोण बनवले आहे. ते आटोपायलट आहे. २०१८ च्या आंतरराष्ट्रीय ड्रोण प्रदर्शनात प्रतापचा ‘अल्बर्ट आइन्स्टाईन’ पुरस्काराने सत्कार करण्यात आला.

‘करोना’ भारतातील दुसरा रुग्णही केरळातच आढळला

प्रताप म्हणतो की, ड्रोणनिर्मिती मी स्वतः शिकलो. ड्रोण तयार करण्यासाठी तुटलेले जुने ड्रोण, मोटार, कॅप्यासीटर वापरतो, यामुळे ई-कचरा कमी निर्माण होतो. प्रतापचे आयआयटी बॉम्बे आणि आयआयएससीमध्ये ड्रोणनिर्मिती विषयावर भाषण झाले आहे. सध्या तो डीआरडीओच्या एका प्रकल्पावर काम करतो आहे.