‘आदु, तुझ्या पप्पांनी केंद्राकडून तुझ्यासाठी फक्त बायकोच मागायची सोडली’, नितेश राणेंची मिस्कील टीका

Aaditya Thackeray & Uddhav Thackeray & Nitesh Rane

मुंबई : सर्वांचं लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाचा (Maratha Resrvation)निकाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून आला. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिले. त्यानंतर विरोधकांकडून ‘ठाकरे’ सरकारची कोंडी सुरू झाली आहे. त्यामुळे कालरात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी सोशल मीडियावरुन जनतेशी संवाद साधत आता राष्ट्रपती आणि केंद्र सरकारच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तोडगा काढू शकेल. यासाठी केंद्राने आणि राष्ट्रपतींनी लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. यावरून भाजप नेते नितेश राणेंनी (Nitesh Rane)मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरेंवर(Aditya Thackeray) मिस्कील टीका केली.

नितेश राणेंनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. आताच झालेल्या मुख्यमंत्री FB live नंतर आलेली योग्य प्रतिक्रिया.. आदु… तुझ्या पप्पांनी केंद्रसरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त.., असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवरच हल्लाबोल केला

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निकालानंतरही त्यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. मुख्यमंत्री साहेब.. तुमच्या आदित्य किवा तेजसचे कोणी अधिकार हिसकावून घेतले असते. त्यांचे भविष्य कोणी अंधारात टाकले असते..तर..मग..मराठा आरक्षण नक्कीच टिकवले असते!!!, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button