भ्रष्टाचारासाठी महाविकास आघाडीचा बरोबर ताळमेळ जमतो, नितेश राणेंची टीका

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्व परीक्षेची नवी तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा १४ मार्चऐवजी २१ मार्चला म्हणजे रविवारी घेण्यात येणार आहे. एमपीएसी परीक्षेच्या नवीन तारखेवरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitish Rane) आक्रमक झाले आहे. राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) हा एक त्रास झाला आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.

हॉलतिकीट कशाला काढली. विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन ढासळलं आहे. त्यांचं नुकसान झालं तर ते सरकार भरून देणार का? राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत विद्यार्थ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. जेव्हा भ्रष्टाचार करायचा असतो. टेंडर पास करायचे असते, तेव्हा सरकारमधील लोकांचा ताळमेळ चांगला असतो, राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे,” अशी टीकाही नितेश राणेंनी केली.

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी न्याय मिळवून द्यायचा असेल तर सचिन वाझेंची चौकशी झाली पाहिजे. अँटिलियाच्या बाहेर नेमकं काय झालं, हे जर आपल्याला खरंच जाणून घ्यायचं असेल तर सचिन वाझेंची चौकशी आणि अटक झालीच पाहिजे. हे नेमकं अतिरेकी प्रकरण आहे की खंडणीचा विषय आहे हे बाहेर यायला हवं,” असे नितेश राणे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER