‘एकावे ते नवलच’ अशा नितिश राणाच्या गेल्या सहा खेळी

nitish Rana - Maharastra Today
nitish Rana - Maharastra Today

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सलामी फलंदाज नितीश राणा (Nitish Rana). हा आयपीएलच्या (IPL) इतिहासात एकदम आगळीवेगळी नोंद असलेला फलंदाज ठरला आहे. रविवारी त्याने 56 चेंडूत 80 धावा केल्या. यासह आयपीएलमधील गेल्या सहा डावातील त्याच्या खेळी

0,
81,
0,
87,
0,
80

अशा राहिला. हा त्याच्या खेळींचा क्रम भन्नाट आहे आणि सध्या त्याचीच चर्चा आहे.

केवळ आलटून पालटून 0 व 80+ धावा एवढेच नाही तर याच हे जे तिन्ही शून्य आहेत त्या डावांमध्ये तो पहिल्याच चेंडूंवर बाद झालाय ही अगदी ऐकावे ते नवलच अशा प्रकारची नितीश राणाची कामगिरी आहे. आयपीएल सोडा पण एकूणच क्रिकेटमध्ये कुण्या फलंदाजाच्या नावावर क्वचितच अशा विशेष खेळी असतील.

त्यामुळे आता पुढच्या सामन्यात तो शून्यावरच बाद होईल त्यापेक्षा त्याला पुढच्या सामन्यात खेळवूच नका असा सल्ला काहींनी केकेआर व्यवस्थापनाला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button