नितीशकुमार दिल्लीत जातील, बिहारमध्ये होईल भाजपाचा मुख्यमंत्री – उपेंद्र कुशवाहा

Nitish Kumar- Upendra Kushwaha

पाटणा : बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार (Nitish Kumar) पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा मुद्दा चर्चेत आहे. याबाबत राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा (Upendra Kushwaha) यांनी सर्वांना धक्का देणारे विधान केले आहे. ते म्हणालेत – नितीशकुमार दिल्लीत जातील, बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होईल!

एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणालेत, निवडणुकीत एनडीएचा विजय झाला तर नितीशकुमार मुख्यमंत्री होणार नाहीत! भाजपाचाच मुख्यमंत्री होईल. नितीशकुमार यांना दिल्लीला पाठवले जाईल. भाजपा आणि नितीशकुमार यांच्यामध्ये याबाबत ‘डील’ झाले आहे.

कुशवाहा म्हणाले, मला वाटते की भाजपा आणि नितीशकुमार यांच्यामध्ये डील झाली आहे. नितीशकुमारही मुख्यमंत्री न होण्याबाबत सहमत आहेत. त्यांच्या नावावर दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांची मत घेऊन नितीशकुमार यांना दिल्लीत सेट करुन बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री करायचा, असे ठरले आहे. मात्र, बिहारचे लोक असं होऊ देणार नाहीत.”

नितीशकुमार यांच्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांची १५ वर्षे बिहारमध्ये सत्ता होती. या दोन्ही नेत्यांनी बिहारच्या जनतेला निराश केले आहे. गावांमधील सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची अद्यापही वानवा आहे. गरीब लोक उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये जातात. बेरोजगार लोक यापूर्वी स्थालांतर करत होते; आजही करत आहेत. त्यांचा राज्याबाहेर अपमान होतो, तरीही राज्याबाहेर जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER